भारतात मिळणार अमेझॉन इको शो ८ स्मार्ट डिस्प्ले

0

अमेझॉनने इको शो ८ हा स्मार्ट डिस्प्ले भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून यात आठ इंची एचडी स्क्रीनचा समावेश आहे.

अमेझॉनने काही दिवसांपूर्वीच इको शो ८ या स्मार्ट डिस्प्लेचे अनावरण केले होते. तेव्हाच हे मॉडेल लवकरच भारतात सादर करण्यात येईल असे मानले जात होते. या अनुषंगाने आता हा स्मार्ट डिस्प्ले भारतात लाँच करण्यात आला आहे. याचे मूल्य १२,९९९ रूपये असून याची अमेझॉनवरून विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल २६ फेब्रुवारीपासून मिळणार आहे.

नावातच नमूद असल्यानुसार इको शो ८ या मॉडेलमध्ये आठ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात शटरयुक्त इनबिल्ट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तसेच यात स्टीरिओ साऊंडचा सपोर्टदेखील दिलेला आहे. या उपकरणात व्हिडीओ कॉलींगसह दूरचित्रवाणी कार्यक्रम तसेच चित्रपट पाहता येणार आहेत. यावर अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या स्ट्रीमिंगची सुविधा दिलेली आहे. याशिवाय, अ‍ॅपल म्युझिक, वुथ आदींचा सपोर्टदेखील यात दिला आहे.

अमेझॉन इको ८ या मॉडेलमध्ये अलेक्झा हा ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडवर चालणारा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत दिलेला आहे. यामुळे या उपकरणावरून व्हिडीओ कॉलींगसह अन्य फिचर्सचा वापर करण्यासाठी फक्त व्हाईस कमांड पुरेशी ठरणार आहे. या स्मार्ट डिस्प्लेला अन्य स्मार्ट उपकरणांशी कनेक्ट करून वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here