अमेझॉन इको शो ५ चे अनावरण; लवकरच भारतातही मिळणार

0

अमेझॉनने आपले इको शो ५ या स्मार्ट डिस्प्लेचे अनावरण केले असून हे मॉडेल लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहे.

अमेझॉन इको शो ५ या मॉडेलचे आज अनावरण करण्यात आले. यात ५.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. इको शो या मूळ मॉडेलच्या तुलनेत हा डिस्प्ले आकारमानाचे थोडा लहान आहे. अर्थात, हा फरक वगळता यात मूळ मॉडेलनुसार सर्व फिचर्स देण्यात आलेले आहेत. अर्थात, यामध्ये अलेक्झा या डिजीटल असिस्टंटला व्हाईस कमांड म्हणजे ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. युजर अलेक्झाला अमेझॉन प्राईम व्हिडीओवरून चित्रपट, मुव्ही ट्रेलर्स, दूरचित्रवाणी कार्यक्रम आदी दाखवण्याची आज्ञा देऊ शकतो. तर अमेझॉन प्राईम म्युझिकवरून संगीतदेखील ऐकता येणार आहे. याशिवाय, अलेक्झाचे अन्य सर्व फंक्शन्स यात वापरता येतील. यात अमेझॉन सिल्क आणि मोझिला फायरफॉक्स ब्राऊजरवरून इंटरनेट सर्फींगदेखील करता येणार आहे.

याच्या पुढील बाजूस एचडी कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजर व्हिडीओ कॉलींग करू शकतो. यात स्काईप कॉलींगचा सपोर्टदेखील दिलेला आहे. यात कॅमेर्‍यात इनबिल्ट शटर दिलेला आहे. यामुळे याचा उपयोग होत नसतांना हे शटर लावण्यात येते. यातून अर्थातच कॅमेर्‍याचा बचाव होणार आहे. भारतात हा स्मार्ट स्पीकर जुलै महिन्यात उपलब्ध करण्यात येणार असून याचे मूल्य ८,९९९ रूपये असेल असे अमेझॉन इंडियाने नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here