अमेझॉनच्या फॅब फोन फेस्टमध्ये आकर्षक सवलती

0

अमेझॉन इंडियावर फॅब फोन फेस्ट प्रारंभ झाला असून यात विविध कंपन्यांच्या ख्यातप्राप्त मॉडेल्सवर अतिशय आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

अमेझॉनचा फॅब फोन फेस्ट १० ते १३ जूनच्या दरम्यान जाहीर करण्यात आलेला आहे. यात ग्राहकांना विविध मॉडेल्सवर डिस्काऊंट, नो-कॉस्ट इएमआय, एक्सचेंज ऑफर्स आदी मिळणार आहेत. याच्या अंतर्गत वन प्लस ६ टी या उच्च श्रेणीतील मॉडेल्सच्या ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज या व्हेरियंटवर तब्बल १४ हजारांची सवलत मिळणार आहे. यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांना २७,९९९ रूपयात मिळणार आहे. तर या सेलमध्ये आयफोन एक्स हे मॉडेल आजवरच्या सर्वात कमी मूल्यात उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अमेझॉन इंडियाने जाहीर केले आहे. सॅमसंगच्या गॅलेक्सी एम ३० आणि एम २० या मालिकांमधील विविध स्मार्टफोन्स अनुक्रमे १४,९९० आणि ९,९९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. शाओमीच्या रेडमी ७चे विविध व्हेरियंट हे या फेस्टमध्ये ९,९९९ ऐवजी ७,९९९ रूपयांपासून मिळणार आहेत. तर शाओमीचेच मी ए२, रेडमी ६ ए आणि रेडमी वाय २ या मॉडेल्सवरही आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अमेझॉन फॅब फोन फेस्टमध्ये विवो व्ही प्रो आणि विवो नेक्स हे मॉडेल्स अनुक्रमे २६,९९० आणि ३९,९९० रूपये मुल्यात मिळणार आहेत. तर याच कंपनीचा वाय ९१ आय हा स्मार्टफोन ७,९९० रूपयात मिळणार आहे. ओप्पो एफ ११ प्रो या मॉडेलवरही सवलत मिळणार असून याला २३,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. याशिवाय ऑनर ९एन, ऑनर ८एक्स, ओप्पो ए५, हुआवे पी३० प्रो, नोकिया ८.१, ऑनर व्ह्यू २०, सॅमसंग गॅलेक्सी नोट ९, ऑनर १० लाईट आदी स्मार्टफोन्सही सवलतीत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here