अमेझॉनचा पोर्टेबल स्मार्ट स्पीकर

0

अमेझॉनने इको इनपुट हा पोर्टेबल स्मार्ट स्पीकर भारतीय ग्राहकांना सादर केला असून याची विक्रीपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

अमेझॉनने आपल्या इको या मालिकेच्या माध्यमातून स्मार्ट स्पीकर्सची विविध मॉडेल्स ग्राहकांना सादर केली आहेत. यात आता इको इनपुट या मॉडेलची भर पडणार आहे. याचे मूल्य ४,९९९ रूपये असून ग्राहक याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून अगावू नोंदणी करू शकतात. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे हा वापरण्यासाठी पोर्टेबल असल्याने तो अगदी कुठेही वापरणे शक्य आहे. यासाठी यात ४,८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे दहा तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. याआधीचे इको स्मार्ट स्पीकर्स हे इलेक्ट्रीकच्या प्लगमध्ये चार्ज करावे लागत होते. मात्र यात इनबिल्ट बॅटरी असल्याने हा स्पीकर अगदी कुठेही वापरता येईल. यातच हे मॉडेल वॉटरप्रुफ असल्याने पावसातही वापरता येणार आहे. अर्थात, या माध्यमातून याला व्यापक स्वरूप मिळाल्याचेही दिसून येत आहे.

अमेझॉनच्या इको इनपुट या मॉडेलमध्ये चार अतिशय संवेदनशील मायक्रोफोन दिलेले आहेत. युजरने दिलेल्या ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांड ऐकून याचे आकलन करण्याचे काम हे मायक्रोफोन करतात. यातील स्पीकर हे ३६० अंशात उच्च दर्जाचा ध्वनी निर्मित करत असल्याचा कंपनाचा दावा आहे. यात अमेझॉनचा अलेक्झा हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजर हा अन्य स्मार्ट स्पीकर्सप्रमाणे विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो. यात कॉल करणे वा रिसीव्ह करणे, हेडलाईन्स, वेदर अलर्टस् आदींसह अन्य फंक्शन्सचा समावेश आहे. याच्या कार्यान्वयनासाठी हा स्मार्ट स्पीकर वाय-फायच्या मदतीने कनेक्ट असणे गरजेचे आहे. तर स्मार्टफोनवरील संगीत हे यावर ब्ल्यु-टुथच्या मदतीने ऐकता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here