अमेझॉनचा नवीन किंडल ई-रीडर दाखल

0

अमेझॉनने भारतीय ग्राहकांसाठी नवीन किंडल ई-रीडर सादर करण्याची घोषणा केली असून यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

अमेझॉनने आधीच किंडलच्या अनेक आवृत्त्या भारतीय ग्राहकांना सादर केल्या आहेत. यात आता न्यू किंडलची भर पडणार आहे. याचे मूल्य ७,९९९ रूपये असून याची अमेझॉन इंडियावरून विक्रीपूर्व नोंदणी सुरू झाली आहे. यात काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यामध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक इंकचा वापर करण्यात आला असून यामुळे उत्तम कॉन्ट्रास्ट मिळणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे याच्या समोर देण्यात आलेल्या चार एलईडींचा प्रकाश हा अ‍ॅडजस्ट करता येणार आहे. यामुळे युजर त्याला सोयिस्कर वाटणार्‍या प्रकाशात ई-बुक्स वाचू शकतो. याची डिझाईनसुध्दा थोड्या प्रमाणात बदलण्यात आलेली आहे. याला काळा आणि पांढरा या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.

नवीन किंडल ई-रीडरमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि ग्लेअर-फ्री या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ४ जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले असून यामध्ये हजारो ई-बुक्स सेव्ह करता येणार आहेत. यात वाय-फाय कनेक्टीव्हिटी प्रदान करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here