झोमॅटो, स्वीगीला अमेझॉन देणार आव्हान

0
amazon

अमेझॉन लवकरच फुड डिलीव्हरीच्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे संकेत मिळाले असून यामुळे झोमॅटो व स्वीगीला तगडे आव्हान उभे राहू शकते.

ऑनलाईन शॉपींगच्या क्षेत्रात आघाडीवर असणारी अमेझॉन इंडिया कंपनी आता फुड डिलीव्हरीच्या क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेझॉन सध्या कॅटरमॅरन या भारतीय कंपनीसोबत याची चाचणी घेत आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्येच निवडक शहरांमध्ये अमेझॉनची ही सेवा सुरू होऊ शकते. सध्या ऑनलाईन फुड डिलीव्हरीत झोमॅटो आणि स्वीगी आघाडीवर आहे. अमेझॉन या क्षेत्रात आल्यास दोन्ही कंपन्यांना तगडे आव्हान उभे राहू शकते. याच्या जोडीला उबर इटस् समोरही आव्हान उभे राहू शकते.

देशात ऑनलाईन फुड डिलीव्हरीच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात वृध्दी होत असून अगदी लहान शहरांमध्येही या प्रकारातील सेवा लोकप्रिय होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, अमेझॉनसारख्या मातब्बर कंपनीने या क्षेत्रात एंट्री करण्याचा केलेला प्रयत्न हा आधीच्या कंपन्यांसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here