अमेझॉन प्राईम म्युझिकला मिळाली अलेक्झाची साथ !

0

अमेझॉन प्राईम म्युझिकला आता अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे.

अलेक्झा या अमेझॉनच्या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटचा विपुल प्रमाणात वापर केला जात आहे. याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढविण्यात येत आहे. या अनुषंगाने आता अमेझॉन प्राईम म्युझिक या सेवेतही अलेक्झाचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात आता या म्युझिक स्ट्रीमिंग सेवेचा आनंद घेण्यासाठी फक्त अलेक्झाला व्हाईस कमांड द्यावी लागणार आहे. म्हणजेच आता हँडस् फ्री या प्रकारात संगीताचा आनंद घेता येणार आहे. हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

अमेझॉनने गेल्या वर्षीच अमेझॉन प्राईम म्युझिक ही सेवा भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे. याला अमेझॉन प्राईम सेवेत समाविष्ट करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत युजरला त्वरीत डिलीव्हरी मिळण्यासह अमेझॉन प्राईम व्हिडीओची सेवादेखील देण्यात आली आहे. यासाठी वार्षीक ९९९ रूपयांची आकारणी करण्यात आलेली आहे. अथवा युजर यासाठी १२९ रूपये महिन्याच्या प्लॅनची निवडदेखील करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here