अँब्रेनची नवीन पॉवर बँक दाखल

0

अँब्रेन कंपनीने पीपी १२ ही नवीन पॉवर बँक बाजारपेठेत सादर केली असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

अँब्रेन पीपी १२ या मॉडेलचे मूल्य १,७९९ रूपये असून याला रेड आणि ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या पॉवर बँकमध्ये १०,००० मिलीअँपिअर क्षमता प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल पाचशे वेळेस चार्ज आणि डिसचार्ज होऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे. याचा आकार अतिशय आटोपशीर असल्यामुळे याला सोबत नेण्यास काहीही अडचण येणार नाही. याची डिझाईन अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की, यावर कोणत्याही प्रकारचे ओरखडे पडणार नसल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. ओव्हर चार्ज अथवा डिसचार्ज झाल्यानंतरही या पॉवर बँकचे कोणतेही नुकसान होणार नाही. यासाठी यात स्वतंत्र प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय यात शॉर्ट सर्कीट अथवा ओव्हर व्होल्टेजमुळे नुकसान होणार नाहीय.

सध्या पॉवर बँकेच्या क्षेत्रामध्ये शाओमीने जबरदस्त मुसंडी मारली आहे. या कंपनीने अतिशय किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम मॉडेल्स सादर केले असल्यामुळे भारतीय ग्राहकांची शाओमीला पसंती मिळाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, अँब्रेनचे पी १२ हे मॉडेल शाओमीच्या वर्चस्वाला आव्हान देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here