अँड्रॉइड ऑटोचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

0

गुगलने आपल्या अँड्रॉइड ऑटो अ‍ॅपचे अपडेट सादर केले असून यात डार्क मोडसह अन्य सुुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

अँड्रॉइड ऑटो या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर आपला स्मार्टफोन अथवा अन्य स्मार्ट उपकरण हे कारच्या डॅशबोर्डवर असणार्‍या इन्फोटेनमेंट/नेव्हिगेशन सिस्टीमला संलग्न करू शकतो. अलीकडच्या काळात बहुतांश कारचा डॅशबोर्डवर इन्फोटेनमेंट सिस्टीम्स असल्याने अँड्रॉइड ऑटोचा वापरदेखील विपुल प्रमाणात वाढला आहे. यातच आता युजर्सला नवनवीन सुविधा देण्यासाठी गुगलने अँड्रॉइड ऑटो अ‍ॅपचे नवीन अपडेट सादर केले असून याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

यात नमूद केले आहे की, कोणतेही वाहन ड्राईव्ह करतांना अनेक बाबींची तातडीने माहिती हवी असते. अँड्रॉइड ऑटोच्या माध्यमातून याला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याच्या अंतर्गत आता या अ‍ॅपला डार्क मोड प्रदान करण्यात येणार आहे. यामुळे अंधारात संलग्न असणार्‍या इन्फोटेनमेंट प्रणालीच्या डिस्प्लेवर डोळ्यावर ताण न येता पाहता येणार आहे. यात नवीन ठळक फाँटचा समावेशदेखील करण्यात आला आहे. तसेच कार सुरू झाल्यानंतर लागलीच युजर यावरून संगीत सुरू असतांनाच नेव्हिगेशनची सुविधा मिळवू शकेल. यात नवीन नेव्हिगेशन बार देण्यात येणार असून यावरून युजरला प्रत्येक टर्नचे नेव्हिगेशन सुलभपणे पाहतांना स्मार्टफोनचा कॉलींगसाठीही उपयोग करता येईल. या नवीन नेव्हिगेशन बारमुळे कमी वापर करून जास्त फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येईल. यावर नवीन नोटिफिकेशन सेंटर प्रदान करण्यात आले असून या ठिकाणी रिसेंट कॉल्स, मॅसेज आदी माहिती पाहता येणार आहे. तर नवीन अपडेटमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीमचा डिस्प्लेच्या आकारानुसार अँड्रॉइड ऑटोचा आकार आपोआप अ‍ॅडजस्ट होणार आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हे अपडेट प्रत्येक युजरला मिळणार असल्याचे गुगलने जाहीर केले आहे.

पहा : अँड्रॉइड ऑटोमधील झालेले बदल दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here