#AndroidHelp हॅशटॅगवरून मिळणार स्मार्टफोनधारकांना मदत

0

गुगलने #AndroidHelp या हॅशटॅगच्या माध्यमातून स्मार्टफोनधारकांना ट्विटर अकाऊंटवरून मदत प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

गुगलने आपल्या ट्विटर हँडलवरून अधिकृतपणे घोषणा करून अँड्रॉइड स्मार्टफोनधारकांना फक्त एका हॅशटॅगच्या माध्यमातून मदत करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. खरं तर या आधीदेखील ट्विटरवरून मदत देण्यात येत होती. तथापि, अनेक युजर्सचा याबाबत गोंधळ उडत होता. यामुळे अँड्रॉइडचे अधिकृत खाते असणार्‍या @Android या अकाऊंटवर #AndroidHelp हा हॅशटॅग देऊन आता कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनमध्ये येणार्‍या अडचणीबाबत प्रश्‍न विचारू शकतो. याचे उत्तर ट्विटरवरूनच जाहिरपणे देण्यात येणार आहे.

अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्सला अनेक अडचणी भेडसावत असतात. या प्रामुख्याने स्मार्टफोन क्रॅश होण्यापासून ते विविध अ‍ॅप्सबाबतच्या तक्रारींचा समावेश असतो. या पार्श्‍वभूमिवर, फक्त एका हॅशटॅगच्या मदतीने युजर्सला मदत देण्याची घोषणा गुगलने केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here