अ‍ॅपलच्या एयरपॉडस् प्रो मॉडेलचे आगमन

0

अ‍ॅपलने नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाने युक्त असणार्‍या एयरपॉडस् प्रो या मॉडेलचे अनावरण केले असून यात अनेक सरस फिचर्स आहेत.

अ‍ॅपलने एयरपॉडस् प्रो या वायरलेस इयरबडस्ला ग्राहकांसाठी सादर केले आहे. याचे भारतातील मूल्य २४,९९० रूपये आहे. आधीच्या मॉडेलनुसार याचे डिझाईनदेखील अतिशय उत्तम असून यात अनेक सरस फिचर्स आहेत. यात वर नमूद केल्यानुसार अतिशय अद्ययावत अशी नॉईस कॅन्सलेशन प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यात दोन अतिशय संवेदनशील मायक्रोफोन देण्यात आले असून ते बाहेरचा आवाज कमी करून युजरला उत्तम दर्जाची श्रवणानुभूती देण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या मॉडेलवर फोर्स सेन्सर देण्यात आले असून याच्या माध्यमातून याच्या मदतीने नॉईस कॅन्सलेशन आणि ट्रान्सपरन्सी मोडमध्ये हवा तसा बदल करता येणार आहे. यामध्ये अडॅप्टीव्ह इक्यू हे विशेष फिचर असून याच्या मदतीने युजरला सुश्राव्य ध्वनीची अनुभूती मिळेल. यासाठी यात इनबिल्ट एचडीआर अ‍ॅप्लीफायर दिलेले आहे.

एयरपॉडस् प्रो या मॉडेलमध्ये अ‍ॅपलचा एच१ हा प्रोसेसर दिलेला आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात सिरी हा अ‍ॅपलचा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत दिलेला आहे. याच्या मदतीने युजर व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावली वापरून हव्या त्या फंक्शनचा वापर करू शकतो. यात कनेक्ट असणार्‍या स्मार्टफोनवरून कॉल करणे वा रिसिव्ह करणे, संगीताचा ट्रॅक पुढे-मागे करणे, याचा आवाज कमी-जास्त करणे आदी फंक्शन्सचा समावेश आहे. यातील बॅटरी एकचा चार्ज केल्यानंतर सुमारे साडेचार तासांचा बॅकअप देण्यास सक्षम आहे. तर यासोबत असणार्‍या इयरकेसमध्ये असणारी बॅटरी ही जवळपास १८ तासांचा बॅकअप देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासोबत विविध आकारांच्या तीन इयर कव्हर्स देण्यात येणार आहेत. ब्ल्यु-टुथच्या मदतीने हे इयरबडस् स्मार्टफोनला कनेक्ट करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे याचा पाण्यातही वापर करता येईल. तर याच्या जोडीला मोशन डिटेक्टींग व स्पीच डिटेक्टींग अ‍ॅक्सलेरोमीटर आणि ड्युअल ऑप्टीक सेन्सर्स दिलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here