अ‍ॅपल टिव्ही प्लस स्ट्रीमिंग सेवेची घोषणा

0

अ‍ॅपलने आपल्या आजच्या कार्यक्रमात अ‍ॅपल टिव्ही प्लस या ऑन डिमांड स्ट्रीमिंग सेवेची घोषणा केली.

अ‍ॅपलतर्फे आज आयोजित करण्यात आलेल्या लाँचींग कार्यक्रमात विविध उपकरणांची घोषणा होणार असल्याचे अपेक्षित होते. विशेष करून यातील आयफोनच्या नवीन आवृत्तीबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. यासोबत अन्य उपकरणेदेखील अपेक्षित होती. या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात अ‍ॅपल टिव्ही प्लसची घोषणा करण्यात आली. ही स्ट्रीमिंग सेवा असणार आहे. या सेवेसाठी महिन्याला ४.९९ डॉलर्स इतकी आकारणी करण्यात येणार असून यातील पहिला महिना मोफत पाहता येणार आहे. या सेवेमध्ये अनेक ओरीजनल टायटल्सचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबत यात चित्रपटांचा मोठा खजिनादेखील असणार आहे. या माध्यमातून अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्ससारख्या सेवांना आव्हान उभे करण्याची तयारी अ‍ॅपलने केल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here