अ‍ॅपलचे नवीन आयपॅड, आयमॅक भारतात सादर

0

अ‍ॅपलने कोणताही गाजावाजा न करता आपल्या आयमॅक संगणकासह आयपॅड या टॅबलेटचे नवीन व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत.

अ‍ॅपलने आधी आयपॅड मिनी व आयपॅड एयरची नवीन मालिका सादर केली. यानंतर आयमॅकची नवीन मालिका भारतीय ग्राहकांना उपलब्ध केली आहे. यातील आयपॅड मिनी आणि आयपॅड एयरचे विविध व्हेरियंटस्चे मुल्य अनुक्रमे ३४,९०० आणि ४४,९०० रूपयांपासून सुरू होणारे आहेत. यातील आयपॅड मिनी हा नावातच नमूद असल्यानुसार तुलनेत कमी आकारमानाच्या डिस्प्लेने युक्त आहे. यात ७.९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २०४८ बाय १५३६ पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात ऑक्टा-कोअर ए१२ बायोनिक प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. यात २५६ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय आहेत. तर यातील बॅटरी ही १० तासांपर्यंत बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

आयपॅड एयर या मॉडेलमध्ये १०.५ इंच आकाराचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२२४ बाय १६६८ पिक्सल्स क्षमतांचा रेटीना डिस्प्ले दिलेला आहे. यात एम१२ प्रोसेसर असून यातही २५६ जीबीपर्यंत स्टोअरेजचे पर्याय आहेत. या दोन्ही मॉडेलच्या मागे ८ तर समोर ७ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे दोन्ही आयपॅड आयओएस १२ या प्रणालीवर चालणारे आहेत.

यानंतर अ‍ॅपलने २१.५ इंची फोर-के रेटीना डिस्प्ले व २७.५ इंची फाईव्ह-के रेटीना डिस्प्लेयुक्त आयमॅक संगणकदेखील भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. या दोन्ही मॉडेल्सच्या विविध व्हेरियंटचे मूल्य अनुक्रमे १,१९,९०० आणि १,६९,९०० रूपयांपासून सुरू होणारे आहेत. या दोन्ही मॉडेल्समध्ये ८ कोअर आणि नवव्या पिढीतील अतिशय गतीमान असे प्रोसेसर्स दिलेले आहेत. याच्या जोडीला व्हेगा ग्राफीक्स प्रोसेसरही यात दिलेले आहे. दोन्ही मॉडेल्स मॅकओएस मोजाव्हे या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here