अ‍ॅपलची व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा लाँच

0

अ‍ॅपलने अ‍ॅपल टिव्ही प्लस या नावाने व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू केली असून या माध्यमातून नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडीओला तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपलने या वर्षी मार्च महिन्यात चार सेवांची घोषणा केली होती. यामध्ये अ‍ॅपल न्यूज प्लस, अ‍ॅपल आर्केड, अ‍ॅपल कार्ड आणि अ‍ॅप प्लस यांचा समावेश होता. यातील अ‍ॅपल टिव्ही प्लस ही सेवा आता भारतात सुरू करण्यात आली आहे. ही व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा आहे. अर्थात, यात युजर त्याला हवे असणारे चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, डॉक्युमेंटरीज, म्युझिक व्हिडीओज आदी पाहू शकतो. याशिवाय, या मंचावर वेब सेरीजदेखील उपलब्ध असतील. ही सेवा लाँच करण्याआधी अ‍ॅपलने मनोरंजनाचा मोठा खजिना यावर उपलब्ध केला आहे. यात अनेक ओरिजनल टायटल्स, ख्यातप्राप्त दिग्दर्शकांचे चित्रपट, वेब सेरीज आदींचा समावेश आहे. यावरून विविध वाहिन्यांचे कार्यक्रमदेखील पाहता येणार आहेत. अ‍ॅपल टिव्ही प्लस ही सेवा अ‍ॅपल कंपनीचीच उपकरणे अर्थात आयफोन, आयपॅड, आयमॅक आदींवरून पाहता येतील. तर निवडक स्मार्ट टिव्हीवरही याला पाहता येणार आहे. भारतीय युजर्स याला आठ दिवस ट्रायल म्हणून मोफत पाहू शकतील. यानंतर मात्र त्यांना ९९ रूपये प्रति-महिना इतक्या दराने आकारणी केली जाणार आहे.

अ‍ॅपल टिव्ही प्लसमुळे नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम व्हिडीओ, हॉटस्टार आदींसारख्या आधीपासून कार्यान्वित असणार्‍या सेवांना तगडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. विशेष करून अ‍ॅपलने याचे दर कमी ठेवल्यामुळे युजर्स याच्याकडे आकर्षीत होऊ शकतात. अर्थात, यातून व्हिडीओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात प्रचंड चुरशीचे वातावरण निर्मित होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here