ब्लॅकबेरी मॅसेंजर जाणार काळाच्या पडद्याआड

0

ब्लॅकबेरी मॅसेंजर बंद करण्यात येणार असून कधी काळी व्हाटसअ‍ॅपचा स्पर्धक असणारी ही सेवा आता काळाच्या पडद्याआड जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरं तर जवळपास दोन दशकांपासून मॅसेंजर्स अस्तित्वात आहेत. अगदी याहूपासून आपण याला वापरत आलेले आहोेत. मात्र स्मार्टफोन क्रांतीनंतर व्हाटसअ‍ॅपचा झालेला उदय हा तमाम स्पर्धकांना धडकी भरवणारा ठरला. अनेक कंपन्यांनी व्हाटसअ‍ॅपला आव्हान देण्याचे केलेले प्रयत्न हे थिटे पडले. खरं तर, ब्लॅकबेरी कंपनीने आपल्या बीबीएम म्हणजेच ब्लॅकबेरी मॅसेंजरला २००५ सालीच लाँच केले होते. अर्थात, व्हाटसअ‍ॅपच्या आगमनाआधीच हा मॅसेंजर कार्यान्वित झाला होता. याला प्रारंभीच्या कालखंडात अतिशय उत्तम प्रतिसाददेखील लाभला होता. तथापि, यानंतर आलेल्या व्हाटसअ‍ॅपने अतिशय जोरदार आगेकूच केली. ब्लॅकबेरीने बीबीएमच्या माध्यमातून व्हाटसअ‍ॅपच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. तथापि, याला यश लाभले नाही. यामुळे आता हा मॅसेंजर ३१ मे पासून बंद करण्यात येणार असल्याची घोषणा याची मालकी असणार्‍या एमटेक कंपनीने केली आहे. यामुळे आता हा मॅसेंजर काळाच्या पडद्याआड जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्लॅकबेरी मॅसेंजर हा बंद करण्यात येणार असला तरी याची एंटरप्रायजेस एडिशन मात्र सुरू राहणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. अर्थात यासाठी प्रत्येक सहा महिन्यानंतर २.५० डॉलर्स इतके मूल्य चुकवावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here