बोट रॉकर्झ वायरलेस हेडफोन्स दाखल

0

बोट कंपनीने रॉकर्झ हा नवीन वायरलेस हेडफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

बोट रॉकर्झ या मॉडेलचे मूल्य १,८९९ रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकणार आहेत. हे ओव्हर-द-इयर या प्रकारातील मॉडेल असून यामध्ये नॉईस कॅन्सलेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य अशा संगीताची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये ३४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० तासांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा हेडफोन ब्ल्यु-टुथ ५.० या प्रणालीच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करता येतो. याशिवाय याला वायर्ड या प्रकारात वापरण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here