जीप कंपास ट्रेलहॉकच्या नोंदणीस प्रारंभ

0

जीप कंपास या एसयुव्हीच्या ट्रेलहॉक या नवीन आवृत्तीची विक्रीपूर्ण नोंदणी सुरू झाली असून कंपनीचे याचे सर्व फिचर्स जाहीर केले आहेत.

जीप कंपास ट्रेलहॉक हे मॉडेल जुलै महिन्यात अधिकृतपणे लाँच करण्यात येणार आहे. याआधी कंपनीच्या संकेतस्थळावर या मॉडेलची लिस्टींग करण्यात आली असून देशभरातील शो-रूम्समधून याची अगावू नोंदणीदेखील सुरू करण्यात आली आहे. यातील बहुतांश फिचर्स हे मूळ जीप कंपास प्रमाणेच आहेत. मात्र यात काही नवीन मॉडेल्सचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे यात ९ स्पीड अ‍ॅटोमॅटीक ट्रान्समीशनची सुविधा दिलेली आहे. याशिवाय, यामध्ये नवीन डिझाईनयुक्त ग्रील व अलॉय व्हिल्स दिलेले असून फ्रंट आणि रिअर बंपर्सही नवीन दिलेले आहेत. तसेच यात ड्युअल टोन या प्रकारातील रंगसंगती असेल.

जीप कंपास ट्रेलहॉक या मॉडेलच्या अंतर्भागातही मूळ मॉडेलपेक्षा थोडे बदल करण्यात आलेले आहेत. यात ८.४ इंच आकारमानाची टचस्क्रीन डिस्प्लेयुक्त इन्फोटेनमेंट प्रणाली दिलेली आहे. यात नेव्हिगेशन, म्युझिक सिस्टीम, नोटिफिकेशन्स आदी सुविधा दिलेल्या आहेत. यात अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो प्रणालींचा सपोर्ट दिलेला आहे. यात २.० लीटर क्षमतेचे मल्टीजेट टर्बोचार्ज्ड या प्रकारातील डिझेल इंजिन प्रदान करण्यात आले आहे. तर वर नमूद केल्यानुसार यामध्ये ९ स्पीड अ‍ॅटोमॅटीक गिअर्स संलग्न करण्यात आलेले आहेत. या मॉडेलचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. तथापि, याचे एक्स-शोरूम मूल्य २५ ते २८ लाखांच्या दरम्यान असेल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here