बीएसएनएलचा भन्नाट प्लॅन; सुसाट वेगासह दररोज मिळणार ४० जीबी डाटा

0
BSNL

बीएसएनएलने नवीन प्लॅन सादर केला असून याच्या अंतर्गत ग्राहकाला दररोज ४० जीबी डाटा हा १०० एमबीपीएसच्या वेगाने मिळणार आहे.

बीएसएनएलने अलीकडेच भारत फायबर ही फायबर-टू-द-होम ब्रॉडबँड सेवा कार्यान्वित केली आहे. रिलायन्स जिओच्या गिगाफायबर या आगामी सेवेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत फायबर लाँच करण्यात आल्याची बाब उघड आहे. यामुळे ग्राहकांना किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम प्लॅन्स सादर केले जात आहेत. या अनुषंगाने आता ४० जीबी प्लॅन सादर करण्यात आला आहे. नावातच नमूद असल्यानुसार याच्या अंतर्गत ग्राहकाला दररोज ४० जीबी डाटा आणि तोदेखील तब्बल १०० मेगाबाईट प्रति सेकंद इतक्या गतीने मिळणार आहे. ही मर्यादा पार केल्यानंतर युजरला २ एमबीपीएस इतक्या गतीने अमर्याद इंटरनेट वापरता येणार आहे. यासोबत ग्राहकाला अमर्याद स्थानिक आणि एसटीडी कॉलींगची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे.

या प्लॅनचे मूल्य २४९९ रूपये असून याची वैधता एक महिन्यासाठी असणार आहे. तसेच २८ फेब्रुवारीपर्यंत या प्लॅनला ६ अथवा १२ महिन्यांसाठी घेणार्‍या ग्राहकाला २५ टक्के कॅशबॅक देणार असल्याची घोषणा बीएसएनएलतर्फे करण्यात आली आहे. अर्थात ग्राहकांना सहा महिन्यांसाठी ३,७०० तर १२ महिन्यांसाठी ७,४०० रूपये सवलत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here