बीएसएनएलच्या ‘या’ दोन प्लॅनवर मिळतोय दररोज १० जीबी डाटा !

0

बीएसएनएलने ९६ आणि २३६ रूपयांचे दोन प्लॅन सादर केले असून यात युजर्सला दररोज तब्बल १० जीबी फोर-जी डाटा वापरण्यासाठी मिळणार आहे.

भारतीय टेलकॉम क्षेत्रात वर्चस्वाची तुंबळ लढाई सुरू असतांना बीएसएनएल ही सार्वजनीक क्षेत्रातील कंपनी काहीशी पीछाडीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी त्यांच्यातर्फे आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगाने बीएसएनएलने आता ९६ आणि २३६ रूपयांचे दोन एसटीव्ही प्लॅन्स सादर केले आहेत. यात ग्राहकांना दररोज १० जीबी डाटा वापरण्याची सुविधा मिळणार आहे. यातील पहिल्या प्लॅनची वैधता २८ तर दुसर्‍या ८४ दिवसांची आहे. यामुळे अर्थात या दोन्ही प्लॅन्समध्ये अनुक्रमे २८० आणि ८४० जीबी डाटा ग्राहकाला मिळणार आहे. इतक्या कमी मूल्यात दररोज १० जीबी डाटा वापरण्याची सुविधा देऊन बीएसएनएलने या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. अर्थात, हे फक्त डाटा प्लॅन्स असून यासोबत कॉलींगची सुविधा दिलेली नाही. तर बीएसएनएलच्या फोर-जी नेटवर्क कार्यान्वित करण्यात आलेल्या परिसरातच याला लागू करण्यात आले आहे. सुदैवाने महाराष्ट्रातील बर्‍याच भागात फोर-जी नेटवर्क सुरू असल्याने याचा लाभ आपल्याला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here