किफायतशीर नोकिया २.३ स्मार्टफोन : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

एचएमडी ग्लोबलने किफायतशीर मूल्य असणारा नोकिया २.३ हा स्मार्टफोन सादर केला असून याची कंपनीच्या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आली आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबलने भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत असून ही कंपनी सातत्याने विविध प्रॉडक्ट भारतात लाँच करत आहेत. या अनुषंगाने आता नोकिया २.३ हे मॉडेल लाँच करण्याचे संकेत मिळाले आहेत. हा स्मार्टफोन एंट्री लेव्हलचा असून याची कंपनीच्या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आली आहे. यानुसार या मॉडेलचे मूल्य ५,९९९ रूपये इतके राहणार आहे. ग्राहकांना हे मॉडेल सायन ग्रीन, सँड आणि चारकोल या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

नोकिया २.३ या स्मार्टफोनमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि इन-सेल या प्रकारातील एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा हेलीओ ए२२ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविता येणार आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असून यात १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यात एआय तंत्रज्ञानाने सज्ज असणारी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांचा बॅकअप देणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा आहे. येत्या काही दिवसांमध्ये नोकिया २.३ हा स्मार्टफोन अधिकृतपणे लाँच करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here