कॅमेरा अ‍ॅपमधून स्मार्टफोनवर होतेय हेरगिरी !

0

स्मार्टफोनमधील कॅमेरा अ‍ॅपमधून युजर्सची गोपनीय माहिती चोरली जात असल्याचा दावा सायबर सिक्युरिटीमधील ख्यातप्राप्त कंपनीने केल्याने खळबळ उडाली आहे.

युजर्सच्या गोपनीय माहितीची सुरक्षा हा अलीकडच्या काळात कळीचा मुद्दा बनला आहे. यातच आता चेकमार्क्स या सायबर सुरक्षेतील विख्यात कंपनीने दिलेला इशारा हा युजर्सला अस्वस्थ करणारा ठरला आहे. अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे गुगलचे पिक्सल मालिकेतील मॉडेल्स आणि सॅमसंगच्या काही स्मार्टफोनमध्ये कॅमेरा अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सची गोपनीय माहिती चोरली जात असल्याचा दावा या फर्मतर्फे करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने गुगलच्या कॅमेरा अ‍ॅपच्या माध्यमातून हा सर्व प्रकार होत असल्याचे या कंपनीच्या संशोधनातून दिसून आला आहे. यात स्मार्टफोनमधील एसडी कार्डमध्ये स्टोअर करण्यात आलेल्या प्रतिमा वा व्हिडीओचा अ‍ॅक्सेस करण्यासाठी परमिशन घेतली जाते. तथापि, यासोबत संबंधीत एसडी कार्ड आणि त्या स्मार्टफोनमधील अन्य माहितीदेखील या परमीशनच्या नावाखाली चोरली जात असल्याचे त्यांना दिसून आले. यामुळे चेकमार्क्सने याबाबत अलर्ट जारी केला. याची दखल घेत गुगलने आपल्या अ‍ॅपमध्ये आवश्यक त्या सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या आहेत. तथापि, यातून युजर्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here