कॅनॉनचा इओएस २००डी २ डीएसएलआर कॅमेरा भारतात सादर

0

कॅनॉनने आपला इओएस २००डी २ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

कॅनॉन इओएस २००डी २ या मॉडेलचे मूल्य ५२,९९५ रूपये असून डबल झूम किटसह याचे मूल्य ६५९९५ रूपये आहे. याला कॅनॉनच्या देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये २४.१ मेगापिक्सल्सचे एपीएस-सी सीएमओएस सेन्सर देण्यात आले आहे. यात डिजीक ८ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने अतिशय सुस्पष्ट अशा प्रतिमा घेता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यातील आयएसओ रेंज १०० ते २५६०० असून ती ५१,२०० पर्यंत वाढविता येणार आहे. यामध्ये ड्युअल पिक्सल सीएमओएस एएफ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून यामुळे अंधुक उजेडातील चांगल्या प्रतिमा काढता येतील. ऑटो लायटींग ऑप्टीमायझरच्या मदतीनेही प्रतिमांचा दर्जा वाढण्यासाठी मदत होणार आहे. या कॅमेर्‍यात आय-डिटेक्शन ऑटो फोकस हे फिचर दिले असून याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा फोटो तो गतीमान अवस्थेत असतांनाही काढला असतांना त्याचे डोळे स्थिर ठेवता येणे शक्य आहे. यामध्ये क्रियेट असिस्ट प्रणाली दिली असून याच्या मदतीने आवश्यक त्या सेटींगमध्ये पटकन जाता येणार आहे. यामधून फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार असून याच क्षमतेत टाईम-लॅप्स व्हिडीओदेखील घेता येणार आहेत.

कॅनॉन इओएस २००डी २ या मॉडेलमध्ये ३ इंच आकारमानाचा एलसीडी डिस्प्ले दिला असून याच्या मदतीने या कॅमेर्‍यातील विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करता येणार आहे. यात वाय-फाय कनेक्टीव्हिटीचा पर्याय दिलेला असून याच्या मदतीने कुणीही कॅमेर्‍यातील फोटो आणि व्हिडीओ हे पटकन शेअर करू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here