गुगल फोटोजवर चॅटींगची सुविधा

0

गुगल फोटोजने आपल्या युजर्ससाठी चॅटींगची सुविधा उपलब्ध केली असून याच्या माध्यमातून एंगेजमेंट वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

गुगल फोटोजवर कुणीही छायाचित्रे वा व्हिडीओ अपलोड करू शकतात. याचे अल्बम तयार करता येतात. तसेच यांना अन्य युजर्सला लिंकच्या स्वरूपात शेअर करण्याची सुविधादेखील आधीपासून देण्यात आलेली आहे. दरम्यान, गुगल युजर्सला आता काही नवीन फिचर्स देण्यात आले असून याची माहिती एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. याआधी गुगल फोटोजने अन्य युजर्सला फोटो अथवा व्हिडीओ हे लिंकच्या स्वरूपात नव्हे तर थेट पाठविण्याची सुविधादेखील दिलेली आहे. यात एकाच वेळी एकापेक्षा जास्त युजर्सला शेअरींग करण्याची सुविधाही प्रदान करण्यात आलेली आहे. यासोबत आता गुगल फोटोजचे युजर्स एकमेकांशी चॅटींग करू शकणार आहेत. अर्थात, फोटो वा व्हिडीओ शेअरिंगसोबत चॅटींगची सुविधा आता मिळणार आहे. या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

हे नवीन फिचर्स गुगल फोटोजच्या अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपसह वेब आवृत्तीसाठीही प्रदान करण्यात आल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आलेली आहे. गुगलने मॅसेजींगच्या क्षेत्रात पाय रोवण्याचे आजवरचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत. यामुळे विद्यमान टुल्सलाच मॅसेजींगचा आयाम प्रदान करण्याचे प्रयत्न याद्वारे सुरू असल्याचेही दिसून आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here