चीनी कंपनी लीगोचा भारतात प्रवेश; तीन स्मार्टफोन लाँच

0

लीगो या ख्यातप्राप्त चीनी कंपनीने भारतात प्रवेश केला असून पहिल्या टप्प्यात तीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत.

भारतातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेवर चीनी कंपन्यांनी चांगले यश मिळवले आहे. सॅमसंग या दक्षिण कोरियन कंपनीचा अपवाद वगळता सर्व आघाडीचे स्मार्टफोन उत्पादक या चीनी कंपन्याच असल्याची बाब लक्षणीय आहे. यातच आता लीगो या कंपनीनेही भारतात प्रवेश केला आहे. लीगो ही चीनमधील मातब्बर स्मार्टफोन उत्पादक कंपनी समजली जाते. भारतात एंट्री करतांना लीगोने एस११; एम१२ आणि एम१३ हे तीन मॉडेल्स लाँच केले असून यांचे मूल्य अनुक्रमे १२,१९९; ६,८५० आणि ९,१९९ रूपये इतके आहे.

लीगो एस ११ या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा, एचडी प्लस क्षमतेचा आणि वॉटरड्रॉप नॉचने युक्त असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा हेलीओ पी २२ हा प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिली आहे. याच्या मागील बाजूस १३ व २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा सेटअप असून फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. यातील बॅटरी ३३०० मिलीअँपिअरची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे.

लीगो एम१२ या मॉडेलमध्ये ५.७४ इंच आकारमानाचा, एचडी प्लस क्षमतेचा व वॉटरड्रॉप नॉचयुक्त डिस्प्ले दिला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी आहे. यातील मुख्य ड्युअल कॅमेरा सेटअप हा ८ व २ मेगापिक्सल्सचा असून फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

लीगो एम१३ या मॉडेलमध्ये ६.१ इंची आकारमानाचा, एचडी प्लस क्षमतेचा व वॉटरड्रॉप नॉचयुक्त डिस्प्ले दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. याच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये ८ मेगापिक्सल्स आणि ०.०८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यातील बॅटरीदेखील ३,००० मिलीअँपिअर क्षमतेचा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here