कलरफिट २ फिटनेस बँड सादर : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

नॉईस या कंपनीने कलरफिट २ हा फिटनेस बँड सादर केला असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

वेअरेबल्स म्हणजेच परिधान करण्यायोग्य उपकरणांची लोकप्रियता सध्या वाढीस लागली आहे. या अनुषंगाने नॉईस या स्टार्टपने कलरफिट २ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे. याचे मूल्य १,९९९ रूपये असून याला ब्लॅक, ब्ल्यू आणि पिंक या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे. याच्या उपलब्धतेबाबत लवकरच माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

कलरफिट २ या मॉडेलमध्ये अतिशय दर्जेदार डिस्प्ले दिलेला असून तो अगदी प्रखर सूर्यप्रकाशातही पाहता येत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याला आयपी६८ या मानकानुसार तयार करण्यात आले असल्यामुळे हा बँड वॉटरप्रूफ व डस्टप्रूफ असून याचा रफ वापर करता येणार आहे. यात फिटनेस आणि हेल्थ ट्रॅकींगचे सर्व फिचर्स देण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत २४ तासांपर्यंत सातत्याने कार्यरत असणारे हार्ट रेट मॉनिटर, स्टेप काऊंटर, स्लीप ट्रॅकर आदींचा समावेश आहे. महिलांसाठी यात पिरीयड सायकल हे फिचर दिलेले आहे. या फिटनेस बँडमध्ये ११ विविध वर्कआऊटला ट्रॅक करण्याची सुविधा दिली असून यात चालणे, योगा, धावणे आदींसह अन्य व्यायाम प्रकारांचा समावेश आहे. याला अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. यामुळे या अ‍ॅपवर फिटनेसशी संबंधीत संपूर्ण माहिती आणि याचे अचूक विश्‍लेषण एकाच ठिकाणी पाहण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. तर स्मार्टफोन आणि यातील विविध अ‍ॅप्सचे नोटिफिकेशन्स या फिटनेस बँडवर पाहता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here