कोरोना इफेक्ट : झूम अ‍ॅपच्या लोकप्रियतेत वाढ

0

लॉकडाऊनमुळे भारतीय युजर्समध्ये झूम अ‍ॅपच्या लोकप्रियतेत वाढ झाली असून याचे डाऊनलोड हे व्हाटसअ‍ॅप व टिकटॉकपेक्षा जास्त झाल्याचे दिसून येत आहे.

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहे. जगातील अनेक देशांमध्ये यामुळे सार्वजनीक जीवनातील संचारावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. यामुळे सिलीकॉन व्हॅलीतील मातब्बर टेक कंपन्यांपासून जगभरातील अन्य लहान-मोठ्या कंपन्या आणि आस्थापनांनी आपापल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. किंबहुना या प्रकारातील कामांसाठी प्रोत्साहीत केले आहे. याचे प्रतिबिंब अ‍ॅपच्या वापरातील बदलाच्या स्वरूपात दिसून आले आहे. जगभरातील युजर्सचा कल लक्षात घेता, व्हाटसअ‍ॅप, टिकटॉक, इन्टाग्राम, फेसबुक आदी अ‍ॅप हे लोकप्रियतेत आघाडीवर असल्याचे दिसून येत होते. मात्र कोरोनाच्या इफेक्टमुळे या सर्वांना मागे टाकून झूप अ‍ॅप लोकप्रिय झाल्याचे ताज्या आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून भारतात झूम अ‍ॅप हे अन्य अ‍ॅप्सच्या तुलतेन सर्वाधीक वेगाने डाऊनलोड करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल १०० युजर्सला ग्रुप कॉन्फरन्स करता येते. यामुळे वर्क फ्रॉम होमसाठी हे अ‍ॅप अतिशय उपयुक्त आहे. याशिवाय, व्हर्च्युअल फॅमिली गॅदरिंगसाठीही याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. यातील व्हिडीओ कॉलींगची क्षमता ही एचडी असल्याने युजर्सच्या पसंतीला हे अ‍ॅप उतरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here