डीटेलचा किफायतशीर एलईडी टिव्ही

0

डीटेल कंपनीने अत्यंत किफायतशीर मूल्य असणारा ३२ इंच आकारमानाचा स्मार्ट टिव्ही बाजारपेठेत सादर केला आहे.

डीटेल ही कंपनी किफायतशीर मूल्य असणारे फिचर फोन आणि अन्य उपकरणांच्या निर्मितीसाठी ख्यात आहे. या कंपनीने ३२ इंची स्टार एलईडी टिव्ही भारतीय ग्राहकांना सादर केला आहे. अलीकडच्या काळात अनेक किफायतशीर मॉडेल्स बाजारपेठेत सादर करण्यात आले असले तरी डीटेलने फक्त ६,९९९ रूपयात हे मॉडेल सादर करून अन्य स्पर्धकांवर मात केल्याचे मानले जात आहे. यात ३२ इंच आकारमानाचा, एचडी क्षमतेचा व ३२+ ए ग्रेड डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. याच्या मदतीने अतिशय दर्जेदार आणि सजीव चलचित्रांची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर यात उत्कृष्ट दर्जाची ध्वनी प्रणाली अर्थात ऑडिओ सिस्टीम देण्यात आलेली आहे. डॉल्बी डिजीटल तंत्रज्ञानाने युक्त असणार्‍या या प्रणालीत प्रत्येकी १० वॅट क्षमतेचे दोन स्पीकर दिलेले आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी यात एचडीएमआय आणि युएसबी पोर्ट प्रदान करण्यात आलेले आहेत. हे मॉडेल कंपनीच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here