डीटेलचा वायरलेस टॉवर स्पीकर सादर

0

डीटेल कंपनीने वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा टॉवर स्पीकर भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

सध्या वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारे हेडफोन्स, इयरफोन्स, स्पीकर आदी उपकरणे लोकप्रिय झाली आहेत. यासोबत याच प्रकारातील टॉवर स्पीकरदेखील ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, फिचरफोनसह अन्य उपकरणांचे उत्पादन करणार्‍या डीटेल या भारतीय कंपनीने याच प्रकारातील मॉडेल बाजारपेठेत सादर केले आहेत. डीटेल थंडर या नावाने हे स्पीकर उपलब्ध करण्यात आले आहेत. याचे मूल्य ४,९९९ रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहेत.

डीटेल थंडर या मॉडेलमध्ये ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमधील संगीत ऐकता येणार आहे. याशिवाय, यामध्ये युएसबी, मायक्रो-एसडी कार्ड रीडर, ऑक्झ-इन आदी पर्याय दिले आहेत. याशिवाय, यामध्ये एफएम रेडिओची सुविधादेखील दिलेली आहे. यामध्ये इनबिल्ट मायक्रोफोन दिला असून हे स्पीकर टिव्हीलादेखील संलग्न करता येणार आहे. यामध्ये वुफर, ट्युटर दिले असून यांच्या मदतीने सुश्राव्य संगीताचा आनंद घेता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here