डीटेलचा वायरलेस स्पीकर सादर

0

डीटेल कंपनीने पॉश हा वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा स्पीकर भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

डीटेल कंपनी ही अत्यंत किफायतशीर दरांचे फिचरफोन्स आणि अन्य उपकरणांसाठी ख्यात आहे. या कंपनीने आता पॉश या नावाने वायरलेस स्पीकर सादर केला आहे. अर्थात ब्ल्यु-टुथच्या मदतीने हे मॉडेल स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येणार आहे. याची रेंज दहा मीटरपर्यंत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. अर्थात इतक्या अंतरापर्यंत हा स्पीकर अन्य स्मार्ट उपकरणांमधील संगीत ऐकवण्यास सक्षम आहे. सर्वातम महत्वाची बाब म्हणजे यात ऑक्झ-इन या प्रकारातील पोर्टदेखील आहे. यामुळे याला वायर्ड या पध्दतीतही वापरता येणार आहे. याशिवाय, यात मायक्रो-एसडी कार्ड आणि युएसबी पोर्टदेखील देण्यात आलेले आहे. या स्पीकरची डिझाईन ही नाविन्यपूर्ण अशी आहे. याला वुडन कव्हर देण्यात आलेले आहे. यामुळे याचा लूक हा अतिशय आकर्षक असाच आहे.

पॉश वायरलेस स्पीकरमध्ये २००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे पाच तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या वायरलेस स्पीकरचे मूल्य १९९९ रूपये असून याला डीटेल कंपनीच्या संकेतस्थळासह अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here