फेसअ‍ॅपची धमाल; ‘ओल्ड एज फिल्टर’ झाले व्हायरल !

0

फेसअ‍ॅप या अ‍ॅपचे नुकतेच सादर केलेले ‘ओल्ड एज फिल्टर’ जगभरात लोकप्रिय झाले असून सोशल मीडियात याचीच धमाल छायाचित्रे शेअर होत आहेत.

फेसअ‍ॅप हे अ‍ॅप ‘वायरलेस लॅब’ या रशियन कंपनीने विकसित केले आहे. २०१७च्या प्रारंभी याला पहिल्यांदा आयओएस आणि नंतर अँड्रॉइड प्रणालीसाठी सादर करण्यात आले होते. अल्पावधीतच याला चांगली लोकप्रियता लाभली. यात ‘आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स’ म्हणजे कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून चेहर्‍यांवर विविध फिल्टर्स व फिचर्सच्या माध्यमातून बदल करण्याची सुविधा दिलेली आहे. अर्थात, कुणीही आपला फोटो ( सेल्फी अथवा गॅलरीतील) अपलोड करून यात हवे ते बदल करू शकतो. ही बदललेली प्रतिमा फेसबुक, ट्विटरसह अन्य सोशल साईटवरून शेअर करता येते. यात आपला चेहरा तरूण करण्यापासून ते त्यावर हास्य लावण्यापर्यंच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. मध्यंतरी या अ‍ॅपवर वर्णद्वेषाचा आरोप करण्यात आल्यामुळे ते वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. यामुळे त्यांना हॉट तसेच अन्य काही फिल्टर्स काढून माफी मागावी लागली होती. यामुळे फेसअ‍ॅपच्या लोकप्रियतेला ग्रहण लागल्याचे दिसून आले होते. तर आता एका नवीन फिल्टरमुळे जगभरात फेसअ‍ॅपची धमाल सुरू झाली आहे. यासाठी कारणीभूत ठरलेय ‘ओल्ड एज फिल्टर !’

फेसअ‍ॅपने अलीकडेच ‘ओल्ड एज फिल्टर’ उपलब्ध केले आहे. याच्या माध्यमातून युजर आपला फोटो अपलोड करून तो वृध्दावस्थेत कसा दिसेल हे नवीन प्रतिमेच्या माध्यमातून दर्शविण्यात येत आहे. यामुळे गंमत म्हणून बरेच युजर्स अशा प्रकारच्या प्रतिमा सोशल मीडियात शेअर करत आहेत. बर्‍याच सेलिब्रिटींनीही याचे शेअरिंग सुरू केले असून आता #फेसअ‍ॅपचॅलेंज हा ट्रेंड तुफान लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

फेसअ‍ॅपची बेसिक आवृत्ती ही मोफत असली तरी यात ‘इन-अ‍ॅप परचेस’ची सुविधा देण्यात आली आहे. याच्या पेड आवृत्तीत फेसअ‍ॅपचा वॉटरमार्क नसतो. तसेच यात काही दर्जेदार फिल्टर्स देण्यात आलेले आहेत. तथापि, मोफत आवृत्तीतच ‘ओल्ड एज फिल्टर’ दिलेले असून ते जगभरातील युजर्सच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येत आहे.

डाऊनलोड लिंक

अँड्रॉइड :- https://play.google.com/store/apps/details?id=io.faceapp

आयओएस :- https://apps.apple.com/app/apple-store/id1180884341

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here