फेसबुकच्या लाईक रिअ‍ॅक्शनमध्ये येणार ‘केअर’चा पर्याय !

1

फेसबुकने आपल्या लाईक रिअ‍ॅक्शनचा विस्तार केला असून यात ‘केअर’ हा नवीन पर्याय आपल्या युजर्ससाठी सादर केला आहे.

फेसबुकच्या लाईक रिअ‍ॅक्शन या बटनच्या माध्यमातून कुणीही युजर हव्या त्या पोस्टवर आपली भावना व्यक्त करू शकतो. आजवर यात लाईक, लव्ह, हाहा, वॉव, सॅड आणि अँग्री अशा प्रकारच्या रिअ‍ॅक्शन्स प्रदान करण्यात आलेल्या होत्या. यात आता ‘केअर’ या नवीन रिअ‍ॅक्शनचा समावेश करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेसबुकचे वरिष्ठ अधिकारी अलेक्झांड्रू व्होईका यांनी एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सध्या जगभरात कोरोना या विकारामुळे हाहाकार उडाला असून याचे सोशल मीडियात प्रतिबिंब उमटल्याचे दिसून येत आहे. समाज माध्यमांमध्येही याबाबत मोठ्या प्रमाणात शेअरिंग केले जात आहे. याच अनुषंगाने केअर हा नवीन पर्याय दिल्याचे मानले जात आहे. यात मिठीच्या माध्यमातून कोरोना सारख्या आपत्तीत आपल्या निकटवर्तींयांची काळजी घेत असल्याचे दर्शविता येणार आहे.

केअर हा पर्याय फेसबुकची डेस्कटॉप आवृत्ती व अ‍ॅप्स तसेच मॅसेंजरवर उपलब्ध होणार आहेत. अर्थात, दोन्ही ठिकाणी यासाठी वेगवेगळे आयकॉन्स उपलब्ध करण्यात आले असून आपण ते या वृत्तात पाहू शकतात. येत्या काही दिवसांमध्ये युजर्सला क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात ही नवीन रिअ‍ॅक्शन वापरता येणार आहे. या माध्यमातून युजर्सची एंगेजमेंट चांगली वाढू शकते असे मानले जात आहे.

1 COMMENT

  1. वाह, अतिशय छान माहिती दिली. आपल्या वेबसाईटवर तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती मराठीतून उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here