फेसबुकचे नोटिफिकेशन्स सुलभपणे बंद करण्याची सुविधा

0

फेसबुक आता आपल्या युजर्सला अतिशय सुलभपणे हव्या त्या नोटिफिकेशन्स बंद करण्याची सुविधा देणार असून हे फिचर आता सादर करण्यात आले आहे.

फेसबुकवर युजर्सला विविध फंक्शन्सचे नोटिफिकेशन्स मिळत असते. यात सेटींगमध्ये जाऊन आपण यापासून मुक्तता मिळवू शकतो. अर्थात, यासाठी सेटींगमध्ये जावे लागते. ही थोडी लांब प्रक्रिया टाळण्यासाठी आता फेसबुकने नवीन सेटींग शॉर्टकट प्रदान केला आहे. यातून आता कुणीही युजर अ‍ॅपवरून अतिशय सुलभपणे नोटिफिकेशन्स ऑफ करू शकतो. यासाठी शॉर्टकट बार सेटींग हा नवीन पर्याय प्रदान करण्यात आला आहे. यामुळे युजर सहजपणे त्याला हव्या नसणार्‍या बाबींचे नोटिफिकेशन्स ऑफ करू शकतो. याबाबत टेकक्रंच या टेक पोर्टलने वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार पहिल्यांदा हे फिचर आयओएस प्रणालीसाठी देण्यात आले असून लवकरच याला अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीमच्या युजर्ससाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. अपडेटच्या स्वरूपात हे फिचर वापरता येणार असल्याची माहिती फेसबुकतर्फे देण्यात आलेली आहे. या फिचरच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्या नेव्हिगेशन बारवर जाऊन मार्केटप्लेस, वॉच, ग्रुप्स, ईव्हेंटस्, प्रोफाईल, फ्रेंड रिक्वेस्ट, टुडे इन, गेमींग अँड डेटींग आदींचे नोटिफिकेशन बंद करू शकतो. यासोबत संबंधीत टॅबदेखील रिमूव्ह करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here