फेसबुकवर आता स्टोरीजमधून साजरा करा वाढदिवस !

0

फेसबुकने आता बर्थडे स्टोरीज हे नवीन फिचर दिले असून याच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा नवीन मार्ग प्रदान केला आहे.

आपल्या युजर्सची एंगेजमेंट वाढण्यासाठी फेसबुक नेहमीच प्रयत्नशील असल्याचे आधीच दिसून आले आहे. यामुळे सातत्याने नवनवीन फिचर्सचा अवलंब करण्यात आला आहे. या अनुषंगाने आता बर्थडे स्टोरीज हे नवीन फिचर देण्यात आल्याची एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. हे फिचर आजपासून जगभरातील युजर्सला सादर करण्यात आले असून ते डेस्कटॉपसह अँड्रॉइड व आयओएस प्रणालीच्या युजर्सला उपलब्ध करण्यात आले आहे.

युजर्सला आता बर्थडे नोटिफिकेशन्समधूनच बर्थडे स्टोरीजचा वापर करता येणार आहे. यासाठी यात स्वतंत्र पर्याय देण्यात येणार असून यावर क्लिक करून कुणीही आपल्या कॅमेर्‍यातून प्रतिमा अथवा व्हिडीओ काढून अपलोड करू शकतो. याशिवाय, यात बर्थडेचे डिजीटल कार्ड, संगीत आदींचा समावेशदेखील करू शकतो. हे बर्डडे कार्ड फेसबुकच्या स्टोरीज विभागात २४ तासांपर्यंत राहणार आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या फेसबुकवरील मित्रांना अनोख्या पध्दतीत शुभेच्छा देऊ शकतो.

फेसबुकवरील स्टोरीज हे फिचर युजर्सला भावले आहे. सध्या जगभरातील तब्बल ५० कोटी युजर्स याचा नियमितपणे वापर करत आहेत. बर्डडे स्टोरीजच्या माध्यमातूनच याच्या लोकप्रियतेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here