व्वा….आता फेसबुकवर ‘सिक्रेट क्रश’ शोधण्याची सुविधा !

0

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी ‘सिक्रेट क्रश’ हे भन्नाट फिचर देण्याची घोषणा केली असून याच्या मदतीने कुणीही गुप्तपणे आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करू शकणार आहे.

फेसबुकने अलीकडेच आपल्या मुख्य अ‍ॅपमध्ये डेटींग हे फिचर दिलेले आहे. सध्या हे निवडक देशांमध्ये उपलब्ध आहे. याच फिचरचा विस्तार करून आता यात सिक्रेट क्रशचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याची घोषणा फेसबुकच्या एफ ८ या कॉन्फरन्समध्ये करण्यात आली. खरं तर आधीच फेसबुकवर मॅसेंजरच्या माध्यमातून चॅटींगची सुविधा देण्यात आलेली आहे. तथापि, हे नवीन फिचर पर्सनल चॅटींगला नवीन आयाम प्रदान करणारे ठरणार आहे. याच्या अंतर्गत कुणीही त्याला आवडणार्‍या व्यक्तींची लिस्ट बनवून यात हव्या असणार्‍याला निमंत्रण पाठवू शकणार आहे. समोरच्या व्यक्तीला एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून याची माहिती जाईल. त्या व्यक्तीने हे निमंत्रण स्वीकारल्यानंतर दोघांना एकमेकांची ओळख दर्शविण्यात येईल. अर्थात तोवर दोन्ही व्यक्तींना समोर कोण आहे याचा थांगपत्तादेखील लागणार नाही. एकदा का सिक्रेट क्रशचे आमंत्रण स्वीकारले की, ते एकमेकांना मॅच झाल्याचे दर्शवून मग ते युगल एकमेकांशी अतिशय सुरक्षितरित्या चॅटींग करू शकतील. असे फेसबुकच्या कॉन्फरन्समध्ये सांगण्यात आले आहे. कुणीही युजर त्याच्या फेसबुकवरील फ्रेंड सर्कलमधील नऊ युजर्सला एकाच वेळी आमंत्रण देऊ शकतो हे विशेष. यातून तो हव्या त्या सिक्रेट क्रशशी चॅटींग करू शकतो.

सध्या अनेक डेटींग अ‍ॅप लोकप्रिय झाले आहेत. मात्र फेसबुकने आपल्याच नेटवर्कमध्ये डेटींग करण्याची सुविधा देण्यास प्रारंभ केल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. यात सिक्रेट क्रशच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण फिचर देण्यात आले आहे. अर्थात याच्या मदतीने फेसबुक आपल्या युजर्सची एंगेजमेंट वाढविणार असल्याचेही दिसून येत आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये सिक्रेट क्रश फिचरची कार्यप्रणाली दर्शविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here