फेसबुकवरून थेट गुगल फोटोजवर प्रतिमा व व्हिडीओ शेअर करण्याची सुविधा !

0

फेसबुकने डाटा ट्रान्सफर प्रोजेक्टच्या अंतर्गत गुगल फोटोजवर प्रतिमा आणि व्हिडीओ थेट शेअर करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

फेसबुकने गेल्या वर्षीच गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, ट्विटर आदींसह अन्य कंपन्यांसोबत डाटा ट्रान्सफर प्रोजेक्टवर काम सुरू केले होते. याच्या अंतर्गत या सर्व कंपन्यांनी आपापल्या मंचावरून अन्य मंचावर अगदी सुलभपणे डाटा ट्रान्सफर करण्याची सुविधा देण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने फेसबुकने आता आपल्या युजर्सला डाटा ट्रान्सफर करण्यासाठी टुल प्रदान करण्याची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत कुणीही युजर आपल्या फेसबुक प्रोफाईलवरील फोटो आणि व्हिडीओ हे अगदी सुलभपणे गुगल फोटोजवर अपलोड करू शकतो. अर्थात, यासाठी स्वतंत्र अपलोडींगची करण्याची आवश्यकता नाही. या प्रकाराने फोटो व व्हिडीओची करण्यात आलेली ट्रान्सफर ही अतिशय सुरक्षित असल्याचा दावा फेसबुकने केला आहे. फेसबुकने डाटा ट्रान्सफरची सुविधा देणारे हे टुल पहिल्यांदा आयर्लंडमध्ये प्रदान केले असून याला लवकरच क्रमाक्रमाने जगभरातील युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे. साधारणपणे २०२०च्या मध्यापर्यंत सर्व युजर्स हे फिचर वापरू शकतील असे कंपनीने जाहीर केले आहे.

दरम्यान, फेसबुकने इन्स्टाग्रामप्रमाणे आपल्या मॅसेंजरच्या युजर्सलाही क्लोज फ्रेंडस् हे फिचर देण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here