फेसबुकवरील इव्हेंटस् आता स्टोरीजमध्ये वापरण्याची सुविधा

0

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी इव्हेंटस्ला आता स्टोरीजमध्ये वापरण्याची सुविधा प्रदान करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकवर स्टोरीज हे फिचर लोकप्रिय झालेले आहे. याला वापरणार्‍या युजर्सची संख्या आता वाढू लागली आहे. यामुळे स्टोरीजची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न फेसबुकतर्फे करण्यात येत आहे. या अनुषंगाने आता स्टोरीजमध्ये कुणीही इव्हेंटची माहिती देऊ शकणार आहे. अलीकडेच या फिचरची ट्रायल घेण्यात आली असून आता याला सर्व युजर्ससाठी क्रमाक्रमाने अपडेटच्या स्वरूपात सादर करण्यात येत आहे. आता कोणत्याही इव्हेंटच्या पेजवर याला स्टोरीच्या स्वरूपात शेअर करण्याचा पर्याय युजर्सला दिसू लागला आहे. यासोबत कोणत्याही इव्हेंटची माहिती आता मॅसेजच्या स्वरूपात पाठविण्याची सुविधादेखील युजरला प्रदान करण्यात आली आहे.

फेसबुकवरील तरूण युजर्सला डोळ्यासमोर ठेवून हे फिचर देण्यात आल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अलीकडच्या कालखंडात तरूणाईमधील फेसबुकचे आकर्षण बर्‍याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे चिंताग्रस्त झालेल्या मार्क झुकरबर्ग यांनी स्टोरीसारख्या फिचरची उपयुक्तता वाढविण्यावर भर दिल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here