फेसबुक मॅसेंजरवर तीन नवीन आकर्षक फिचर्स

0
facebook-messenger

फेसबुक मॅसेंजरवर आता युजर्सला तीन नवीन फिचर्स देण्यात आले असून याच्या माध्यमातून शेअरींग हे अधिक आकर्षक करण्यात आले आहे.

फेसबुक मॅसेंजरवर आता कॅमेर्‍यात बुमरँग व सेल्फी हे दोन नवीन मोड आणि एआर स्टीकर्सचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबतचे विवरण जाहीर करण्यात आले आहे. यातील बुमरँग हे फिचर आधीच इन्स्टाग्राममध्ये वापरण्यात येत आहे. याच्या अंतर्गत युजर आता आपल्या कॅमेर्‍याचा वापर करून लूप व्हिडीओ शेअर करू शकणार आहे. विनोदी पध्दतीचे हे शॉर्ट व्हिडीओ लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. यासोबत सेल्फी मोड देण्यात आलेला आहे. याच्या माध्यमातून कुणीही युजर आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेर्‍यातून काढलेल्या सेल्फी प्रतिमेला बोके इफेक्ट देऊ शकतो. अर्थात, यात चेहरा केंद्रस्थानी ठेवून उर्वरित भागाला धुसर करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. याच्या जोडीला फेसबुक मॅसेंजरवर आता एआर स्टीकर्सची सुविधा देण्यात आली आहे. याच्या माध्यमातून कुणीही युजर आपल्या प्रतिमा अथवा व्हिडीओजवर स्टीकर्स लाऊन त्यांना अधिक आकर्षक बनवू शकतो.

फेसबुक मॅसेंजरचा अलीकडेच कायापालट करण्यात आला आहे. याला नवीन डिझाईन प्रदान करण्यात आलेली आहे. यानंतर आता बुमरँग, सेल्फी आणि एआर स्टीकर्सचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. मॅसेंजरवर दररोज खूप युजर्स चॅटींग करत असतात. ही चॅटींग या नवीन फिचर्सचा सहाय्याने अधिक आकर्षक होणार असल्याचा दावा या ब्लॉग पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here