‘फेसबुक पे’ पेमेंट प्रणालीची घोषणा : जाणून घ्या सर्व माहिती

0

फेसबुकने ‘फेसबुक पे’ या नावाने नवीन स्वतंत्र पेमेंट प्रणाली सादर केली असून याला मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅपचे युजर्स वापरू शकतील.

फेसबुकने अलीकडेच पेमेंट प्रणालीबाबत गांभिर्याने विचार सुरू केल्याचे अधोरेखीत झाले होते. यातच फेसबुकने ‘लिब्रा’ या नावाने व्हर्च्युअल करन्सी म्हणजेच आभासी चलन वापरात आणण्याची घोषणा केली असून याला युरोप आणि अमेरिकेतून विरोध सुरू झाला आहे. अर्थात, एकीकडे लिब्राला विरोध होत असतांना व्हाटसअ‍ॅपवरून पैशांची देवाण-घेवाण करण्याची सुविधादेखील प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता फेसबुकने ‘फेसबुक पे’ या नावाने पेमेंट सिस्टीम सादर करण्याची घोषणा केली असून एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

या माहितीनुसार आता फेसबुक मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅपचे युजर्स फेसबुक पे प्रणालीचा वापर करू शकतील. याचा वापर करण्यासाठी युजरला आपल्याकडे असणार्‍या क्रेडीट वा डेबीट कार्डसह पे-पाल सिस्टीमचा वापर करू शकतील. अर्थात, ‘फेसबुक पे’ वापरण्याआधी युजरला प्रत्यक्ष देवाण-घेवाण करण्यासाठी क्रेडीट/डेबीट कार्ड वा पे-पाल अकाऊंटशी याला संलग्न करावे लागेल. यानंतर युजर याचा वापर करू शकतो. ‘फेसबुक पे’ प्रणालीच्या माध्यमातून कुणीही अतिशय सुरक्षितपणे व्यवहार करू शकणार असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आलेला आहे. यात युजर पीन क्रमांक तसेच फेस आयडी अथवा टच आयडीचे सुरक्षा कवचदेखील लावण्याची सुविधा मिळणार आहे. ही प्रणाली पहिल्यांदा अमेरिकेत सादर करण्यात आली असून येत्या काही दिवसांमध्ये जगभरातील युजर्ससाठी याला उपलब्ध करण्यात येणार आहे. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे कोणत्याही युजरची बायोमॅट्रीक माहिती आम्ही जमा करणार नसल्याची माहितीसुध्दा फेसबुकतर्फे देण्यात आलेली आहे.

खाली पहा : ‘फेसबुक पे’ सिस्टीमची कार्यप्रणाली दर्शविणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here