अखेर फेसबुकच्या संकेतस्थळावर डार्क मोडचे आगमन

0

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चाचणीनंतर फेसबुकने डेस्कटॉपसाठी डार्क मोडचा समावेश असणारे रिडिझाईन सादर केले आहे.

सध्या बहुतांश अ‍ॅपवर डार्क मोड प्रदान करण्यात आलेला आहे. डार्क मोडचा वापर करून कोणतेही संकेतस्थळ वा अ‍ॅपचा पार्श्‍वभाग हा गडद करता येतो. यामुळे दीर्घ काळ स्क्रीन पाहूनही डोळे थकत नाही. यामुळे डोळ्यांवर कमी प्रमाणात ताण येत असल्याच सिध्द झालेले आहे. यामुळे ट्विटरसह अनेक सोशल मीडिया मंचावर डार्क मोड देण्यात येत आहे. या अनुषंगाने फेसबुकने काही महिन्यांपासून डार्क मोडची चाचणी सुरू केली होती. अनेक युजर्सला हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत वापरण्यासाठी मिळाले आहे. यानंतर आता सर्व युजर्ससाठी हे फिचर कार्यान्वित करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात डार्क मोड हा संगणकावरून फेसबुक वापरणार्‍यांना प्रदान करण्यात येत आहे. यासोबत फेसबुकचा नवीन ले-आऊटदेखील दिलेला आहे.

फेसबुकच्या नवीन ले-आऊटमध्ये आधीपेक्षा बर्‍याच प्रमाणात बदल दिसून येत आहे. यात विविध विभागांचे आयकॉन्स हे अधिक ठसठशीतपणे दिलेले आहेत. यामुळे फेसबुकचा नवीन अवतार हा अधिक सुटसुटीत वाटत आहे. यात व्हिडीओज, गेम्स आणि ग्रुप्स हे सहजपणे दिसून येत आहेत. यात पोस्टसह ग्रुप, इव्हेंट, जाहिराती तयार करण्याची प्रक्रिया सुलभपणे करता येईल अशी सुविधा दिलेली आहे. अर्थात, यातील सर्वात लक्षवेधी फिचर हे डार्क मोड होय. कुणीही युजर सेटींगच्या वर क्लिक करून नवीन फेसबुकचा वापर करू शकतो. यात डार्क आणि लाईट या दोन्ही प्रकारच्या थीम वापरण्याचे पर्याय दिलेले आहेत. यात कुणीही डार्क मोड अ‍ॅक्टीव्हेट करू शकतो. हा मोड सुरू केल्यास पार्श्‍वभाग या पूर्णपणे गडद रंगाचा होत असतो. तर ज्या युजरला डार्क मोडयुक्त नवीन फेसबुक वापरायचे नाही त्याला जुने डिझाईन वापरण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी गत वर्षाच्या एफ-८ या कॉन्फरन्समध्ये फेसबुकचा रिडिझाईनच्या माध्यमातून कायापालट करण्यात येईल असे जाहीर केले होते. यानुसार आता फेसबुकचे नवीन डिझाईन युजर्सला वापरता येणार आहे.

असा अ‍ॅक्टीव्हेट करा डार्क मोड

* आपण जर संगणकावरून फेसबुक वापरत असाल तर उजव्या बाजूला वर असणार्‍या अ‍ॅरोवर क्लिक करा.

* यात खालील बाजूस दर्शविण्यात आलेल्या ‘स्वीच टू न्यू फेसबुक’ या पर्यायावर क्लिक करावे.

* येथे आपल्याला लाईट वा डार्क मोडचे पर्याय विचारले जातील. यातील हवा तो पर्याय निवडून आपण फेसबुकची नवीन डिझाईन वापरू शकतो.

* यानंतर युजर उजव्या बाजूला वर असलेल्या अ‍ॅरोवर क्लिक करून आपल्याला हव्या त्या वेळेस लाईट वा डार्क मोड वापरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here