फेसबुकवर क्वाईट मोड : युजर्सच्या विश्रांतीसाठी खास फिचर

0

फेसबुकने आपल्या युजर्ससाठी क्वाईट मोड प्रदान केला असून याच्या माध्यमातून युजर्सला सततच्या सोशल मीडियाच्या वापरातून विश्रांती घेण्याची तजवीज केली आहे.

सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असल्याने लोकांकडे विपुल वेळ आहे. यामुळे जास्तीत जास्त युजर्स हे सोशल मीडियाचा खूप जास्त प्रमाणात वापर करत असल्याचे दिसून आले आहे. फेसबुकही याला अपवाद नसून या मंचावरील युजर्सची सक्रीयता वाढल्याचे अधोरेखीत झाले आहे. या अनुषंगाने युजर्सला मर्यादीत वेळेपर्यंतच आपल्या मंचावर ठेवण्याच्या उद्देश्याने क्वाईट मोड देण्यात आला आहे. या माध्यमातून डिजीटल वेल बिईंगचे एक टुल युजर्सला वापरण्यासाठी मिळणार आहे.

क्वाईट मोड हा जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने प्रदान करण्यात येत आहे. कुणीही याला सेटींगमधील प्रायव्हसी मेन्यूमध्ये जाऊन ऑन करू शकणार आहे. यात हा मोड किती वेळेपर्यंत वापरायचा ? याचा पर्याय देखील दिलेला आहे. एकदा हा मोड ऑन केला की, संबंधीत युजरला फेसबुकशी संबंधीत कोणतेही नोटिफिकेशन येत नाही. तसेच यात न्यूज फिडवर नेमके काय पहावे यासाठीचा शॉर्टकट देखील मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here