फेसबुकवर मिळणार फेक न्यूज अलर्ट

0
Facebook

फेसबुकने आपल्या भारतीय युजर्ससाठी फेक न्यूजबाबतची माहिती अलर्टसच्या स्वरूपात देणारे फिचर कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकने आधी कर्नाटकातील युजर्सला फेक न्यूजबाबतची माहिती अलर्टच्या स्वरूपात सादर करण्याची सुविधा बीटा अर्थात प्रयोगात्मक अवस्थेत सादर केली होती. आता हेच फिचर सर्व भारतीय युजर्ससाठी प्रदान करण्यात येत असल्याची घोषणा फेसबुकतर्फे करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत कोणताही युजर आपल्या टाईमलाईनवरून पाहत असलेल्या बातम्यांपैकी कोणते वृत्त हे फेक आहे याची माहिती त्याला नोटिफिकेशनयुक्त अलर्टच्या स्वरूपात दिली जाणार आहे. अर्थात, हे नोटिफिकेशन मिळण्याआधी संंबधीत कंटेंटची कसून तपासणी करण्यात येईल. यासाठी फेसबुकने एएफपी इंडिया, फॅक्ट क्रेसेंडो, फॅक्टली, न्यूज मोबाईल फॅक्ट चेकर, द क्विंट आणि इंडिया टुडे फॅक्ट चेक आदी वृत्तसंस्थांसोबत सहकार्याचा करार करण्यात आला आहे. या प्रणालीच्या अंतर्गत तंत्रज्ञान आणि कर्मचार्‍यांच्या मदतीने कोणत्याही वृत्ताची सत्यासत्यता पडताळून पाहिली जाणार आहे. अर्थात, यामुळे फेक कंटेंटला आळा बसणार असल्याचा आशावाद फेसबुकतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, एखादे पेज अथवा प्रोफाईलवरून सातत्याने फेक कंटेंट प्रसारीत होत असल्यास त्यावर डिअ‍ॅक्टीव्हेशनची कारवाईदेखील केली जाणार आहे. तर फेक न्यूज प्रचारीत करणार्‍यांना इन्टंट आर्टीकल्ससह अन्य मॉनेटायझेशनचे लाभ कमी करण्यात येणार आहे. राजकारण्यांसाठी मात्र या फिचरमध्ये थोडी सवलत देण्यात येणार आहे. कोणत्याही राजकीय नेत्याने एखाद्या मुद्यावरून थेट दावा केला असल्यास याला फेक कंटेंट म्हणून गणले जाणार नाही. कारण यात संबंधीत नेत्याने याची जबाबदारी घेतलेली असेल असा युक्तीवाद केला जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये भारतातील सर्व युजर्सला हे फिचर टप्प्याटप्प्याने प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकतर्फे देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here