फेसबुकवरही येणार डार्क मोड

0

फेसबुक लवकरच आपल्या युजर्ससाठी डार्क मोड प्रदान करणार असून याची चाचणी सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अलीकडच्या काळात डार्क मोड हा लोकप्रिय झालेला आहे. यामुळे युजर्सच्या डोळ्यांना होणारा त्रास कमी होत असल्यामुळे युजर्सची याला पसंती मिळाली आहे. ट्विटरने आधीच डार्क मोड दिलेला असून या पाठोपाठ युट्युब, फेसबुक मॅसेंजर आदींवरही ही सुविधा मिळालेली आहे. आता फेसबुकवरही डार्क मोड येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेन मॉनचुन वाँग या तंत्रज्ञाला अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये याची चाचणी सुरू असल्याची माहिती दिसून आली असून त्यांनी एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याला जगजाहीर केले आहे.

या ब्लॉग पोस्टनुसार फेसबुकवर लवकर डार्क मोड येऊ शकतो. याला पहिल्यांदा अँड्रॉइड अ‍ॅपसाठी सादर केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे फेसबुकतर्फे याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here