फ्लिपकार्टच्या बिग शॉपींग डेज सेलमध्ये सवलतींचा वर्षाव

0
फ्लिपकार्ट, flipkart

फ्लिपकार्टने आपल्या युजर्ससाठी बिग शॉपींग डेज सेल जाहीर केला असून यात विविध प्रॉडक्टवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत.

फ्लिपकार्टने अलीकडच्या काळात विविध सेलच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षीत करण्याचे प्रयत्न केले आहेत. यात युजर्सला विविधांगी सवलती देण्यात आल्यामुळे याला उदंड प्रतिसाद लाभला आहे. गेल्या महिनाभरात या शॉपींग पोर्टलने तीन सेल जाहीर केले होते. या अनुषंगाने आता ६ ते ८ डिसेंबरच्या दरम्यान बिग शॉपींग डेज या नावाने चौथा सेल जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसीय सेलमध्ये अनेक आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या कालखंडात फ्लिपकार्टने एचडीएफसीच्या क्रेडीट अथवा डेबीट कार्डधारकांना कोणत्याही प्रॉडक्टवर १० टक्के इतका कॅशबॅक देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, संबंधीत कार्डधारकाना नो-कॉस्ट इएमआयची सुविधादेखील देण्यात आली आहे.

बिग शॉपींग डेज सेलच्या दरम्यान स्मार्टफोन्सच्या विविध मॉडेल्सच्या मूल्यात सवलीतीदेखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑनर ९एन हा १३,९९९ रूपये मूल्याचा स्मार्टफोन फक्त ९,९९९ रूपयात मिळणार आहे. शाओमीचा रेडमी नोट६ प्रो हा १५,९९९ रूपये मूल्य असणारा स्मार्टफोन या सेलमध्ये १३,९९९ रूपयात मिळणार आहे. नोकिया ५.१ हे मॉडेल ९,९९९ तर पोको एफ१ हा स्मार्टफोन १९,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. रिअलमी २ आणि रिअलमी २ प्रो हे मॉडेल्स अनुक्रमे ९,४९९ आणि १३,९९० रूपयात मिळणार आहेत. तर ऑनर ७एस, रिअलमी सी१ व असुस झेनफोन लाईट हे मॉडेल्स अनुक्रमे ५,९९९; ७,४९९ आणि ४,९९९ रूपयात मिळणार आहेत. उच्च श्रेणीतील मॉडेल्समध्ये गुगलचा पिक्सेल २ एक्सएल आणि एलजी जी७ थिनक्यू हे स्मार्टफोन्स अनुक्रमे ३९,९९९ आणि २६,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहेत. याशिवाय, अन्य प्रॉडक्टवरही घसघशीत सवलती प्रदान करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here