फ्लिपकार्टच्या व्हिडीओ सेवेसह आयडिया फिचर लाँच

0
फ्लिपकार्ट, flipkart

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू केली असून याच्या जोडीला आयडिया हे फिचर ग्राहकांसाठी लाँच केले आहे.

गत अनेक दिवसांपासून फ्लिपकार्ट हे शॉपींग पोर्टल स्वत:ची व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा सुरू करणार असल्याची चर्चा सुरू होती. या माध्यमातून अमेझॉन प्राईम व्हिडीओला टक्कर देण्याची तयारी करण्यात येणार असल्याचे मानले जात होते. या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले असून फ्लिपकार्टने व्हिडीओ या नावाने ही सेवा सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात याला अँड्रॉइड अ‍ॅपसाठी सादर करण्यात आले असून लवकरच याला वेब आवृत्तीसाठीही सादर करण्यात येईल अशी शक्यता आहे. वास्तविक पाहता व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेत प्रचंड स्पर्धा असतांना फ्लिपकार्टने यात प्रवेश केल्याची बाब लक्षणीय आहे. आपल्या या सेवेसाठी फ्लिपकार्टने व्हीयू, डाईस मीडिया आदींसारख्या कंटेंट प्रोव्हायडरसोबत सहकार्याचा करार केला आहे. सध्या रोमान्स, अ‍ॅडव्हेंचर, ड्रामा, मिस्ट्री आणि कॉमेडी या प्रकारांमध्ये चित्रपट उपलब्ध करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमधील चित्रपट सादर करण्यात आले असून लवकरच यात अन्य भारतीय भाषा तसेच हॉलिवुड सिनेमांचाही समावेश करण्यात येईल असे मानले जात आहे. यासोबत विविध दूरचित्रवाणी कार्यक्रमदेखील युजर्सला पाहता येणार आहेत.

यासोबत फ्लिपकार्टने आयडिया हे नवीन फिचरसुध्दा लाँच केले आहे. याच्या अंतर्गत युजरला त्याच्या आवडी-निवडीशी संबंधीत कंटेंट हे प्रामुख्याने दिसणार आहे. यासाठी ग्राहकाला तीन पर्याय निवडावे लागतील. यानंतर या पर्यायांशी संबंधीत प्रॉडक्ट व अन्य माहिती युजरला प्राधान्यक्रमाने दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर याच प्रकारचे फिचर देण्यात आले असून या माध्यमातून ग्राहकाला प्रॉडक्ट निवडीसाठी सुविधा मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here