फ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू

0
फ्लिपकार्ट, flipkart

फ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू झाला असून यात आगामी पाच दिवसांमध्ये विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती मिळणार आहेत.

ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध ई-कॉमर्स कंपन्या वेळोवेळी सेल जाहीर करतात. या अनुषंगाने आजपासून फ्लिपकार्टचा मोबाईल बोनान्झा सेल सुरू झाला आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा सेल स्मार्टफोन्सशी संबंधीत आहे. याच्या अंतर्गत विविध मॉडेल्सवर डिस्काऊंट देण्यात येत असून काहींसाठी एक्सचेंज ऑफरदेखील जाहीर करण्यात आल्या आहेत. फ्लिपकार्टने यासाठी अ‍ॅक्सीस बँकसोबत खास सहकार्याचा करार केला आहे. अ‍ॅक्सीस बँकेच्या र्कावरून खरेदी करणार्‍या ग्राहकाला १० टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. याशिवाय ग्राहकांना नो-कॉस्ट इएमआय आणि ७० टक्के रकमेपर्यंतची बायबॅक ऑफर तसेच ९९ रूपयांपासून सुरू होणारी मोबाईल प्रोटेक्शन योजना देण्यात येत आहे.

फ्लिपकार्टच्या या मोबाईल बोनान्झा सेलमध्ये काही मॉडेल्सला सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले आहे. यात रिअलमी नोट२ प्रो हे मॉडेल ११,९९९ रूपयात उपलब्ध आहे. रेडमी नोट ६ प्रो हे मॉडेल १२९९९ रूपयात मिळणार आहे. रिअलमी सी१चे दोन व्हेरियंट अनुक्रमे ६,९९९ आणि ७,४९९ रूपयात मिळत आहे. तर रिअलमी २ हे मॉडेल ९,४९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. असुसने आपल्या झेनफोन या मालिकेतील लाईट एल१, मॅक्स एम२ व मॅक्स प्रो एम२ या मॉडेल्सवर प्रत्येकी एक हजाराची सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, अन्य मॉडेल्सवरही याच प्रकारच्या सवलती जाहीर झाल्या आहेत. हा सेल २३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here