फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनान्झा सेलला प्रारंभ

0
फ्लिपकार्ट, flipkart

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून मोबाईल बोनान्झा सेल सुरू झाला असून यात विविध मॉडेल्सवर आकर्षक सवलती देण्यात आल्या आहेत.

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने वर्षाच्या अखेरीस ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी मोबाईल बोनान्झा सेल जाहीर केला आहे. हा सेल २६ ते २९ डिसेंबरच्या दरम्यान सुरू राहणार आहे. यामध्ये विविध मॉडेल्सवर अतिशय आकर्षक असे डिस्काऊंट जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय, ग्राहकांना या कालखंडात एक्सचेंज ऑफर्सदेखील मिळणार आहेत. भारतीय बाजारपेठेत किफायतशीर स्मार्टफोन्स मोठ्या प्रमाणात विकले जातात. याचा विचार करता, या सेलमध्ये बजेट मॉडेल्सवर अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये असुसच्या झेनफोन लाईट एल १ या मूळ ६,९९९ रूपये मूल्य असणार्‍या मॉडेलला ४,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. याच मूल्याचा इन्फीनिक्स स्मार्ट २ या मॉडेललाही ४,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. यू एस हा ७,९९९ रूपये मूल्य असणारा स्मार्टफोन ५,४९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. ऑनर ७एस या ८,९९९ रूपये मूल्य असणार्‍या स्मार्टफोनवर तर तब्बल तीन हजारांची सवलत मिळणार आहे. ऑनरचाच ७ए हा १०,९९९ रूपये मूल्य असणारा स्मार्टफोन या सेलमध्ये ७,४९९ रूपयात मिळणार आहे. तर १३,९९९ रूपये मूल्य असणारा ऑनर ९ एन हा स्मार्टफोन ८,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे.

याशिवाय, या सेलमध्ये विविध कंपन्यांच्या मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. तर वर नमूद केल्यानुसार काही मॉडेल्ससाठी एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here