फोर्ड अस्पायर ब्ल्यू मर्यादीत आवृत्ती सादर

0

फोर्ड मोटर्सने अस्पायर ब्ल्यू लिमिटेड एडिशन २०१९ ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर केली असून यात पेट्रोल व डिझेल हे दोन्ही पर्याय आहेत.

फोर्ड अस्पायर ब्ल्यू लिमिटेड एडिशनच्या पेट्रोल व्हेरियंटचे एक्स-शोरूम मूल्य ७,४०,९०० तर डिझेलचे मूल्य ८,२०,९०० रूपये इतके आहे. याआधी उपलब्ध असणार्‍या टिटॅनियम मॉडेलची ही अद्ययावत आवृत्ती असणार आहे. ही आवृत्ती व्हाईट, मुनडस्ट सिल्व्हर आणि स्मोक या तीन रंगाच्या शेडमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे. यात १.२ लीटर टिआयव्हीसीटी पेट्रोल तर १.५ लिटर टिडीसीआय डिझेल इंजिन दिलेले आहे. या दोन्हींमध्ये मॅन्युअल गिअर्स देण्यात आले असून यांचे मायलेज अनुक्रमे २०.४ आणि २५.५ किलोमीटर प्रति/लिटर इतके आहे.

नावातच नमूद असल्यानुसार फोर्ड अस्पायर ब्ल्यू या आवृत्तीत निळ्या रंगाला प्राधान्य देण्यात आले आहे. बाह्यांगाचा विचार केला असता, यावर अतिशय सुबकपणे निळ्या रंगाच्या स्ट्रिप्स देण्यात आल्या आहेत. तर याची अंतर्गत सजावट ही निळ्या रंगाच्या थीमवर आधारित आहे. यामध्ये ड्युअल टोन या प्रकारातील रंगसंगती देण्यात आली असून छताला काळे कव्हर असणार आहे. याच्या बंपरमध्ये फॉल लँप्सचा समावेश करण्यात आला असून यामध्ये नवीन ग्रील, १५ इंची अलॉय व्हील्स दिलेले आहेत. या आवृत्तीत सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेले आहे. याच्या पुढील बाजूस ड्युअल एयरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तर यात इबीडी (इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रीब्युशन ) युक्त एबीएस अर्थात अँटी-लॉक ब्रेकींग प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे.

फोर्ड अस्पायर ब्ल्यू मर्यादीत आवृत्तीत ७ इंची टचस्क्रीन डिस्प्लेयुक्त इन्फोटेनमेंट प्रणाली देण्यात आलेली आहे. यात ब्ल्यु-टुथ कनेक्टीव्हिटीसह सॅटेलाईट नेव्हिगेशनची सुविधा देण्यात आली आहे. तर अन्य महत्वाच्या फिचर्समध्ये रिअर व्ह्यू कॅमेरा, रिमोट सेंट्रल पार्कींग, पुश स्टार्ट-स्टॉप, पॉवर विंडोज, रिअर पार्कींग सेन्सर आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here