गार्मीनचा विवोस्मार्ट ४ अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर भारतात सादर

0
गार्मिन विवोस्मार्ट ४, garmin vivosmart 4

गार्मीन कंपनीने विवोस्मार्ट ४ हा अ‍ॅक्टीव्हिटी ट्रॅकर भारतीय बाजारपेठेत सादर केला असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी विवोस्मार्ट ४ या मॉडेलचे अनावरण करण्यात आले होते. प्रारंभी याला युरोपसह निवडक बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले होते. आता याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. या मॉडेलचे मूल्य १२,९९० रूपये असून याला निवडक शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.

गार्मिनच्या विवोस्मार्ट ४ या मॉडेलमध्ये अनेकविध उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील लक्षवेधी फिचर म्हणजे यात पल्स ओएक्स हा अद्ययावत हार्ट रेट सेन्सर देण्यात आले आहे. याच्या मदतीने फक्त हृदयाच्या ठोक्यांचेच मापन करता येत नाहीय. तर याच्या जोडीला हृदयातील अनियमितताही यातून तपासता येते. तसेच चालणे, धावणे, व्यायाम करणे आदी अ‍ॅक्टीव्हिटी करत असतांना व्हीओ२ लेव्हलची तपासणी याद्वारे करता येते. यामध्ये पल्स ऑक्सीजन सेन्सर दिलेले आहे. यामुळे निद्रेत असतांना शरीरातील ऑक्सीजनची पातळी मोजता येते. अर्थात याच्याच मदतीने निद्रेचे अतिशय अचूक मापन करता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. गार्मिनच्या विवोस्मार्ट ४ मध्ये ग्रेस्केल डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर विविध नोटिफिकेशन्स पाहता येणार आहेत. यामध्ये अतिशय दर्जेदार बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ७ दिवसांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

पहा : विवोस्मार्ट ४ या ट्रॅकरची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here