जीमेलच्या युजर्सला आता ई-मेलला अटॅचमेंटच्या स्वरूपात पाठविण्याची सुविधा

0

जीमेलच्या युजर्सला आता कोणताही ई-मेल अटॅचमेंटच्या स्वरूपात पाठवू शकणार असून नवीन अपडेटमध्ये ही सुविधा मिळणार आहे.

जीमेलवर कोणताही ई-मेल हा अन्य युजर्सला फॉरवर्ड करण्याची सुविधा आधीच दिलेली आहे. आता कोणताही मेल हा फॉरवर्डच नव्हे तर अटॅचमेंटच्या स्वरूपात पाठविण्याची सुविधा प्रदान करणारे फिचर देण्यात आले आहे. यात कोणताही ई-मेल हा ड्रॅग अँड ड्रॉप या पध्दतीत सिलेक्ट करून अटॅच करता येऊ शकतो. तर बल्क मेललाही ही सुविधा येणार असून यासाठी हवे तितके ई-मेल्स सिलेक्ट केल्यानंतर वरील भागात असणार्‍या तीन डॉटवर क्लिक केल्यानंतर अटॅचमेंटचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर संबंधीत मेल हा अटॅचमेंटच्या स्वरूपात फॉरवर्ड केला जाईल. या प्रकारात एका तसेच एकापेक्षा जास्त युजर्सला अटॅचमेंट पाठविता येणार आहे.

जी-मेलवरील अटॅचमेंट ही फॉरवर्ड या सुविधेपेक्षा थोडी वेगळी आहे. फॉरवर्ड करतांना एका वेळेस एकच मेल हा पुढे फॉरवर्ड केला जातो. तर अटॅचमेंटमध्ये मेल्सची पूर्ण थ्रेड ही एकाच वेळी फॉरवर्ड करता येणार आहे. यामुळे हे फिचर अतिशय उपयुक्त असेल असे मानले जात आहे.

ई-मेल अटॅचमेंटच्या स्वरूपात पाठविण्याची सुविधा ही पहिल्यांदा जी-सुट वापरणार्‍या युजर्सला मिळणार असून नंतर याला क्रमाक्रमाने इतर युजर्सला सादर करण्यात येणार असल्याची माहिती गुगलतर्फे देण्यात आलेली आहे.

खालील अ‍ॅनिमेशनमध्ये ई-मेल अटॅच करण्याची प्रक्रिया दर्शविण्यात आली आहे.

खालील प्रतिमेत बल्क ई-मेल अटॅच कसे करावे हे दर्शविलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here