गुगल असिस्टंट आता युजर्सला हव्या असणार्‍या बातम्या ऐकवणार

0

गुगल असिस्टंटवर आता कुणीही युजर त्याला हव्या असणार्‍या बातम्या एका स्वतंत्र न्यूज फिडच्या माध्यमातून ऐकू शकणार आहे.

गुगल असिस्टंट हा गुगलचा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट असून तो व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने चालतो. स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर आदी उपकरणांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या असिस्टंटच्या मदतीने आधीच बातम्या ऐकता येतात. मात्र त्यासाठी स्वतंत्र कमांड द्यावी लागते. आता मात्र लवकरच युजर्सने केलेली सेटींग, त्याच्या आवडी-निवडी आणि भौगोलिक ठिकाण आदींशी संंबंधीत बातम्या त्याला स्वतंत्र न्यूज फिडच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. या पोस्टनुसार गुगलच्या या नवीन सुविधेला युवर न्यूज फिड अपडेट हे नाव देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत युजरने गुगल असिस्टंटला बातम्या ऐकवण्याची फर्माईश केल्यानंतर त्याला लागलीच त्याच्याशी संबंधीत बातम्या एकामागून ऐक ऐकवण्यास प्रारंभ होईल. यात पहिल्यांदा हेडलाईन वाचून नंतर बातमी पूर्णपणे वाचली जाईल.

गुगल असिस्टंटवरील युवर न्यूज फिड अपडेट हे फिचर पहिल्यांदा अमेरिकेत देण्यात आले असून यासाठी ३८ ख्यातप्राप्त वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंस्थांशी करार करण्यात आला आहे. तथापि, लवकरच जगभरात हे अपडेट देण्यात येणार असून यात अन्य वृत्तसंस्थांचा समावेशदेखील करण्यात येणार आहे. ही पर्सनलाईज्ड न्यूज फिड युजर्सच्या उपयोगात पडण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

खालील व्हिडीओत पहा गुगल असिस्टंटचे हे नवीन फिचर नेमके कसे काम करणार ते ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here